Showing posts with label love romance emotions marathi poetry. Show all posts
Showing posts with label love romance emotions marathi poetry. Show all posts

Sunday, May 1, 2011

क्षितीज

जसा पावसाचा वावर,
उभ्या क्षितिजावर,
सूर्यकिरणांच्या रेषांतून,
इंद्रधनुचा बहर,
मेघ सावळे दाटले,
डोंगरमाथ्यावर,
कधी तहान भागते?
तृषा धरणीची अनावर,
आता बरसून सरी,
चिंब भिजल्यावर,
तुझ्या डोळ्यातले भाव,
आण ओठांच्यावर,
मन माझे उधाण,
भिर भिर वाऱ्यावर,
आता सांडू दे जरा,
तुझ्या प्रेमाचा सागर,
जसा पावसाचा वावर,
उभ्या क्षितिजावर,
उभ्या क्षितिजावर.